Monday, November 26, 2018

या खेळाडुचा क्रिकेट खेळताना मृत्यू झाला



फिलिप ह्यूज ( 2014)
सिडनी क्रिकेट मैदानावर शैफील्ड शील्ड चषकाच्या सामन्यात एक उसळता चेंडू त्याला लागला आणि तो कोसळला.  उपचार करताना 27 नोव्हेंबर ला त्याचा मृत्यू झाला.
डँरेन रैंडल ( २०१३ ) 
आफ्रिकेतील एका स्थानिक सामन्यात फलंदाजी करताना चेंडू हुकला आणि त्यांच्या डोक्यावर चेंडू आदधळा.
जुल्फिकार भट्टी ( २०१३ )
पाकिस्तान तील  स्थानिक सामन्यात चेंडू छातीवर लागला  उपचार करताना खेळाडू चा मृत्यू झाला.
रिचर्ड बेमोंट ( २०१२)
इंग्लंड चा या वेगवान गोलंदाजाला  सामन्या दरम्यान  ह्रदय विकाराचा झटका आला आणि त्याचा उपचार करताना मृत्यू झाला.
वसीम रजा ( २००६ )
५४ व्या वर्षी सरे कडून खेळताना ह्रदय विकाराचा झटका येऊन मृत्यू झाला.
रमन लांबा ( १९९८ )
हा भारताचा माजी खेळाडू .ढाका मध्ये खेळत असताना क्षेत्र रक्षण करते वेळी फलंदाजाने मारलेला चेंडू त्याच्या डोक्याला लागला आणि उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
इयान फोले ( १९९३)
डर्बी शाँयर कडून खेळताना डोळ्याचा खाली चेंडू लागला पण त्यावर उपचार करत असताना ह्रदय विकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला.
विल्फ्र स्लैक ( १९८९ )
इंग्लंड चा हा फलंदाज उजव्या हाताने फलंदाजी करताचा. ३४ वर्षीय  हा फलंदाज एका सामन्या दरम्यान चार वेळेस बेशुद्ध झाला आणि त्याचा मृत्यू झाला.
अब्दुल अजीज ( १९५९ )
पाकिस्तान तील  कायदे आजम चषकाच्या अंतीम सामन्यात चेंडू छातीवर लागुन या १७ वर्षीच्या खेळाडू चा मृत्यू झाला.
एंडी ड्युकेट (  १९४२ ) - हा इंग्लंड चा खेळाडू होता तो फुटबॉल पण खेळत होता. लाँर्डसवर खेळताना ह्रदय विकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला.

No comments:

Post a Comment

या खेळाडुचा क्रिकेट खेळताना मृत्यू झाला

फिलिप ह्यूज ( 2014) सिडनी क्रिकेट मैदानावर शैफील्ड शील्ड चषकाच्या सामन्यात एक उसळता चेंडू त्याला लागला आणि तो कोसळला.  उपचार करतान...