Friday, November 23, 2018

झुलन गोस्वामी महिला क्रिकेट विश्वातील झगमगता सितारा

      
                   झुलन गोस्वामीचा जन्म पश्चिम बंगाल मधील नदिया मध्ये २५-११-२०१८ झाला.ती पश्चिम बंगालमधील नाडिया येथील मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. वयाच्या १५ व्या वर्षी तिने क्रिकेट खेळायला सुरुवात केली.
                    इतर सर्व पालकांप्रमाणे, झुलनच्या पालकांनाही तीला   अभ्यास करण्यास प्रवृत्त केले.परंतु झुलन थांबली नाही. क्रिकेटसाठी तिचे प्रेम वाढलेले पाहून  क्रिकेट प्रशिक्षणासाठी पुढे पाठवले.  तिने कोलकातामध्ये तिचे क्रिकेट प्रशिक्षण पुर्ण केले. त्यानंतर तिने बंगाल क्रिकेट संघात प्रवेश केला.
                  वयाच्या १९ व्या वर्षी  तिने २००२ मध्ये चेन्नईत इंगलैंड विरुद्ध एकदिवसीय सामन्यात,१४ जानेवारी २००२ रोजी लखनौमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी मध्ये आणि २००६ मध्ये डर्बीतर्फे टी -२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
                  झूलनने तिच्या आंतरराष्ट्रीय २० षटकाचे 68 सामने खेळले.तिने 21.94च्या सरासरीने 56 बळी  तर 2012 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिने 11 धावा देत 5 बळी घेतले आहेत. हे तिची सर्वोत्तम कामगिरी आहे.  ट्वेंटी 20 मध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत ती तिसऱ्या स्थानावर आहे. जूनमध्ये 2018मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध ती शेवटचा सामना खेळली होती.
                 झूलनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेतले आहेत.  एकदिवसीय क्रिकेटमध्ये 200 बळी घेणारी तर  10 कसोटी सामन्यात  40 बळी घेतले आहेत. महिला एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात झूलन सर्वाधिक विकेट घेणारी खेळाडू आहे.
                
                 आयसीसी महिला क्रिकेटर ऑफ दी इयर २००७,अर्जुन पुरस्कार २०१०, पद्मश्री  पुरस्कार २०१२ देउन गौरवण्यात आले.

No comments:

Post a Comment

या खेळाडुचा क्रिकेट खेळताना मृत्यू झाला

फिलिप ह्यूज ( 2014) सिडनी क्रिकेट मैदानावर शैफील्ड शील्ड चषकाच्या सामन्यात एक उसळता चेंडू त्याला लागला आणि तो कोसळला.  उपचार करतान...