Monday, November 26, 2018

या खेळाडुचा क्रिकेट खेळताना मृत्यू झाला



फिलिप ह्यूज ( 2014)
सिडनी क्रिकेट मैदानावर शैफील्ड शील्ड चषकाच्या सामन्यात एक उसळता चेंडू त्याला लागला आणि तो कोसळला.  उपचार करताना 27 नोव्हेंबर ला त्याचा मृत्यू झाला.
डँरेन रैंडल ( २०१३ ) 
आफ्रिकेतील एका स्थानिक सामन्यात फलंदाजी करताना चेंडू हुकला आणि त्यांच्या डोक्यावर चेंडू आदधळा.
जुल्फिकार भट्टी ( २०१३ )
पाकिस्तान तील  स्थानिक सामन्यात चेंडू छातीवर लागला  उपचार करताना खेळाडू चा मृत्यू झाला.
रिचर्ड बेमोंट ( २०१२)
इंग्लंड चा या वेगवान गोलंदाजाला  सामन्या दरम्यान  ह्रदय विकाराचा झटका आला आणि त्याचा उपचार करताना मृत्यू झाला.
वसीम रजा ( २००६ )
५४ व्या वर्षी सरे कडून खेळताना ह्रदय विकाराचा झटका येऊन मृत्यू झाला.
रमन लांबा ( १९९८ )
हा भारताचा माजी खेळाडू .ढाका मध्ये खेळत असताना क्षेत्र रक्षण करते वेळी फलंदाजाने मारलेला चेंडू त्याच्या डोक्याला लागला आणि उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
इयान फोले ( १९९३)
डर्बी शाँयर कडून खेळताना डोळ्याचा खाली चेंडू लागला पण त्यावर उपचार करत असताना ह्रदय विकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला.
विल्फ्र स्लैक ( १९८९ )
इंग्लंड चा हा फलंदाज उजव्या हाताने फलंदाजी करताचा. ३४ वर्षीय  हा फलंदाज एका सामन्या दरम्यान चार वेळेस बेशुद्ध झाला आणि त्याचा मृत्यू झाला.
अब्दुल अजीज ( १९५९ )
पाकिस्तान तील  कायदे आजम चषकाच्या अंतीम सामन्यात चेंडू छातीवर लागुन या १७ वर्षीच्या खेळाडू चा मृत्यू झाला.
एंडी ड्युकेट (  १९४२ ) - हा इंग्लंड चा खेळाडू होता तो फुटबॉल पण खेळत होता. लाँर्डसवर खेळताना ह्रदय विकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला.

Friday, November 23, 2018

झुलन गोस्वामी महिला क्रिकेट विश्वातील झगमगता सितारा

      
                   झुलन गोस्वामीचा जन्म पश्चिम बंगाल मधील नदिया मध्ये २५-११-२०१८ झाला.ती पश्चिम बंगालमधील नाडिया येथील मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. वयाच्या १५ व्या वर्षी तिने क्रिकेट खेळायला सुरुवात केली.
                    इतर सर्व पालकांप्रमाणे, झुलनच्या पालकांनाही तीला   अभ्यास करण्यास प्रवृत्त केले.परंतु झुलन थांबली नाही. क्रिकेटसाठी तिचे प्रेम वाढलेले पाहून  क्रिकेट प्रशिक्षणासाठी पुढे पाठवले.  तिने कोलकातामध्ये तिचे क्रिकेट प्रशिक्षण पुर्ण केले. त्यानंतर तिने बंगाल क्रिकेट संघात प्रवेश केला.
                  वयाच्या १९ व्या वर्षी  तिने २००२ मध्ये चेन्नईत इंगलैंड विरुद्ध एकदिवसीय सामन्यात,१४ जानेवारी २००२ रोजी लखनौमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी मध्ये आणि २००६ मध्ये डर्बीतर्फे टी -२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
                  झूलनने तिच्या आंतरराष्ट्रीय २० षटकाचे 68 सामने खेळले.तिने 21.94च्या सरासरीने 56 बळी  तर 2012 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिने 11 धावा देत 5 बळी घेतले आहेत. हे तिची सर्वोत्तम कामगिरी आहे.  ट्वेंटी 20 मध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत ती तिसऱ्या स्थानावर आहे. जूनमध्ये 2018मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध ती शेवटचा सामना खेळली होती.
                 झूलनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेतले आहेत.  एकदिवसीय क्रिकेटमध्ये 200 बळी घेणारी तर  10 कसोटी सामन्यात  40 बळी घेतले आहेत. महिला एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात झूलन सर्वाधिक विकेट घेणारी खेळाडू आहे.
                
                 आयसीसी महिला क्रिकेटर ऑफ दी इयर २००७,अर्जुन पुरस्कार २०१०, पद्मश्री  पुरस्कार २०१२ देउन गौरवण्यात आले.

Wednesday, November 21, 2018

अश्रूंची झाली फुले

मित्रांनो आणि  डाँ काशीनाथ घाणेकर सिनेमाचा ट्रेलर पाहत असताना अश्रूंची झाली फुले या नाटकातील प्रसंग दाखवला. हे वसंत कानेटकर लिखित नाटक.त्यात लाल्या च पात्र आवडल म्हणून सहज अश्रूंची झाली फुले नाटक सर्च केले याआधी कधी नाटक बघीतल नव्हते. नाटक पाहण्यास सुरुवात केली आणि शेवट होईपर्यंत जागा सोडली नाही.एकदम जबरदस्त अभिनय.  यात लाल्याचे पात्र रमेश भाटकरांनी जिवंत केलं.
नाटक पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा


Saturday, November 17, 2018

भारताचा न्युझीलंड दौरा वेळापत्रक

भारताचा न्युझीलंड दौरा वेळापत्रक

प्रथम एकदिवसीय सामना - २३ /०१/२०१८
दुसरा एकदिवसीय सामना - २६/०१/२०१८
तिसरा एकदिवसीय सामना- २८/०१/२०१८
चौथा एकदिवसीय सामना- ३१/०१/२०१८
पाचवा एकदिवसीय सामना - ०३/०२/२०१८

पहिला २०-२० सामना - ०६/०२/२०१८
दुसरा २०-२० सामना  -०८/०२/२०१८
तिसरा २०-२० सामना - १०/०२/२०१८

या खेळाडुचा क्रिकेट खेळताना मृत्यू झाला

फिलिप ह्यूज ( 2014) सिडनी क्रिकेट मैदानावर शैफील्ड शील्ड चषकाच्या सामन्यात एक उसळता चेंडू त्याला लागला आणि तो कोसळला.  उपचार करतान...